1) दुय्यम बाजार आवार ना. रोड - या आवाराची जागा बाजार समितीची असून या आवाराचे क्षेत्रफळ 6 हेक्टर 65 आर आहे. उपबाजार सिन्नरफाटा एकलहरा रस्त्या लगत आहे. या ठिकाणी भाजीपाला डाळींब, फळभाज्या, कांदे, इ. नियंत्रित शेतीमालाचे व्यवहार चालतात.
2) दुय्यम बाजार आवार त्र्यंबकेश्वर - या बाजार आवारातील जागेचे क्षेत्रफळ 0.58.5 हेक्टर इतकी असून सद्यस्थितीत मार्केट उभारणी केलेली आहे.
3) दुय्यम बाजार आवार हरसुल - या बाजार आवाराची जागा ३.९३ हेक्टर ईतकी असुन शेतक-यांसाठी सेलहॉल असुन येथे आंबे तसेच पिक हंगामानुसार शेतमाल विक्रीचे व्यवहार होतात.