मुख्य बाजार आवार - नाशिक येथे आर. टी. ओ. आँफीस जवळ शरदचंद्रजी पवार मुख्य मार्केट असुन त्याचे क्षेत्रफळ 24 हेक्टर 30 आर आहे. तेथे कांदा-बटाटा, सर्व प्रकारची फळे, डाळींब, अन्नधान्य व टमाटा या शेतीमालाचे व्यवहार होतात. याठिकाणी 100 मे. टन क्षमतेचा भुईकाटा चालु केलेला आहे. संपुर्ण बाजार आवार सुरक्षेच्या दृष्टीने सी. सी. टीव्ही ची यंत्रणा बसविणेत आलेली असुन त्याद्वारे बाजार आवारात देखरेख ठेवली जाते.
मुख्य बाजार आवार व दुय्यम आवार येथिल सुखसोयी - नाशिक कृषि उत्पन्न बाजार समितीने तिच्या प्रमुख आवारांत उपहारगृह, रसपानगृह, कार्यालयीन ईमारत, शेतीमाल विक्रीगृह, आवारांत वाँल कंपाऊँड, अंतर्गत पक्के रस्ते, लाईट, पाणी, बॅक, सार्वजनिक दुरध्वनी, ट्रिमिक्सपध्दतीने कॉक्रीटीकरण 30 मे. ठन क्षमतेचा भुईकाटा, दैनंदिन शेतीमालाचे भाव दर्शविण्यासाठी डिस्प्लेबोर्ड, तसेच शेतक-यांना शेतीमालाविषयी माहिती मिळणेसाठी महाराष्ट्र शासनाचे सौजन्याने बाजार माहीती केंद्र चालु करणेंत आलेले असुन सदरची माहिती फ्लॅट स्क्रिन टी. व्ही. वर दैनंदीन दाखविली जाते.या आवारात शेतीमाल विक्रीगृह बांधणेत आलेली आहे. व अंतर्गत पक्के रस्तेही तयार केले आहेत. तसेच लाईट पाणी, सार्वजनिक दुरध्वनी, सी.सी.टिव्ही कॅमेरे, सार्वजनीक शैाचालय, उपहारगृह इ. सुखसोयी पुरविणेत आलेल्या आहेत. तसेच शेतक-यांच्या हितासाठी केंद्रशासनाचे ई-नाम योजने अंतर्गत कामकाज सुरु आहे. जनावरे बाजारात जनावरांसाठी पाण्याचा आहाळ जनावरे उतरविणेसाठी धक्का इ. सोयी करणेत आलेल्या आहेत.