कृषि उत्पन्न बाजार समिती

बाजार समितीची रचना

राज्य शासन प्रत्येक बाजार क्षेत्रासाठी सभापती, उपसभापती व इतर सदस्य यांची मिळुन बनलेली एक बाजार समिती स्थापन करील. बाजार समितीला अखंड अधिकार परंपरा असते, तिची एक सामान्य मुद्रा असुन ज्या प्रयोजनासाठी स्थापना करण्यात आली त्या सर्व गोष्टी करण्यास सक्षम असते.

1) बाजार समिती संचालक मंडळाची रचना –

बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ 5 वर्षासाठी असुन कार्यकारी मंडळात बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी प्रतिनिधी म्हणून 11 सदस्यांची नेमणूक असून कार्यक्षेत्रात असलेल्या विविध कार्यकारी सहकारी संस्था यांचे नऊ प्रतिनिधी पुरूष व दोन महिला प्रतिनिधी, एक इतर मागासवर्गिय, एक विमुक्त जमाती यातील असून चार प्रतिनिधी ग्रामपंचायतीच्या मार्फत येत असून त्यापैकी एक अनुसुचित जाती किंवा अनुसूचित जमातीमधील व्यक्ती आणि एक आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्ती असून दोन प्रतिनिधी अनुज्ञप्तीधारकांमधून व्यापारी प्रतिनिधी व एक तोलणार, हमालांचा प्रतिनिधी तसेच शासकिय प्रतिनिधी, मा. जिल्हा उपनिबंधक सह. संस्था, असे एकुण 19 सदस्यांचे कार्यकारी मंडळ असते. या कार्यकारी मंडळांतील शेतकरी प्रतिनिधींमधून सभापती व उपसभापती निवडण्याची तरतूद असून समितीच्या कामकाजावर सभापतींचे नियंत्रण असते.

अ.नं. मतदार संघ

प्रतिनिधींची संख्या

1 ग्रामपंचायत 4
2 सोसायटी (पुरुष - 9 व महिला - 2)            11
3 व्यापारी 2
4 हमाल तोलणार   1
5 मा. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था
नाशिक. (डी. डी. आर)  
1
                       एकुण 19

बाजार समितीचे कामकाज

1. महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी - विक्री (विकास व विनियमन) अधिनियम 1963 नुसार नियंत्रित केलेल्या कृषि उत्पन्नाची खरेदी - विक्रीचे व्यवहारावर नियंत्रण, बाजारभावाची माहिती शासनास कळविणे, मार्केट फी व सुप फी गोळा करणे, नियमनाचे कामकाज करणे. मार्केटयार्डमध्ये आवकेची नोंदी घेणे, बाजारभावावर प्रसिध्द करणे.

2. बाजार समितीने नियंत्रीत केलेल्या शेतीमालाचे खरेदी-विक्रीचे व्यवहारावर नियंत्रण ठेवणे, बाजार क्षेत्रातील कोणत्याही ठिकाणी कृषि उत्पन्नाच्या खरेदी विक्रीच्या नियमनासाठी आवश्यक असतील अशी इतर कामे करणे. नियमातील तरतुदीनुसार शेतीमालाच्या विक्रीची पध्दत, वजन मापाचे परीमाण, शेतीमालाच्या विक्रीचा हिशोब देण्याची पध्दत, शेतीमालासंबंधी निर्माण झालेल्या विक्री, वजन अगर मोजमाप, बटवडा हिशोब इतर तत्संबंधीत बाबींचा वांधा मिटविणे,

3. आडत्या, व्यापारी, दलाल, तोलणार, मापणार व इतर नियंत्रीत शेतीमालाची खेरदी-विक्री करणारे यांना अनुज्ञप्ती देणे, नुतनीकरण करणे, त्यांचेकडुन निरनिराळ्या प्रकारचे नित्य व नैमित्तीक माहीती पत्रके, सेस गोळा करणे,

4. बाजारात व्यापार करण्यासाठी येणा-या लोकांच्या प्रवेशाचे आणि वाहतुकीचे विनिमय करणे.

5. येणा-या लोकांच्या वागणुकीवर देखरेख ठेवणे, आडत्या, व्यापारी, दलाल, तोलणार, मापणार सर्वेक्षक, वखारवाला, हमाल व मालधनी व बाजाराचे इतर संबंधीत घटक यांची पात्रता व त्यांची कर्तव्ये ठरविणे, लायसेन्स देणे, त्याचे नुतनीकरण करणे, निलंबीत करणे,

6. बाजार क्षेत्रात कृषि उत्पन्नाच्या खेरदी-विक्रीसाठी आवश्यक सुविधांची तरतूद करणे. कृषि उत्पन्नाची विक्रीची पध्दत, त्यांचे मोजमाप करणे, त्यासंबंधात द्यावयाची रक्कम, खरेदी-विक्री संबंधित इतर सर्व बाबी या विहित पध्दतीने अंम्मलबजावणी करणे, बाजारभाव प्रसिध्द करणे. शेतीमालांचा नमुना तपासणे शेतीमालाचे प्रकार व प्रमाणभुत नमुने ठरविणे, भेसळ प्रतिबंधक उपाय योजना करणे.

7. संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयांची अंम्मलबजावणी करणे, शासनाला माहिती देणे.

8. बाजार क्षेत्रातील नियमनाचे फायदे, व्यवहारांची पध्दती, सुविधा यांना प्रसिध्दी देणे.

बाजार समितीचे उत्पन्नाची साधने

मार्केट कमिटीस नियंत्रीत करण्यात आलेल्या शेतीमालाच्या खेरदी-विक्रीच्या व्यवहारात खरेदीदाराकडुन विक्री किमतीच्या शेकडा 1% मार्केट फी व सुप. फी 0.05% या प्रमाणे मिऴत असून याशिवाय जागा भाडे, वाहन प्रवेश फी, काटा भाडे, मेन्टेनन्स चार्ज, आवार भाडे, सांक्षाकन फी, वाहन प्रवेश फी इ. उत्पन्नाची साधने आहेत.

अनुज्ञप्ती

परवाना धारक

अ. न. परवाना तपशिल फी
जनरल कमिशन एजंट अमर्याद रु. १ लाखाच्या पुढे (बाजार क्षेत्रात) 200/-
अ वर्ग व्यापारी रु. 50000 पेक्षा जास्त 200/-
प्रक्रीया अ वर्ग रु. 50000 पेक्षा जास्त 200/-
प्रक्रीया ब वर्ग रु. 50000 पावेतो 200/-
ब वर्ग व्यापारी रु. 50000 पावेतो 200/-
जनावरे व्यापारी बाजार क्षेत्रात कोठेही १00/-
जनावरे दलाल रु. 50000 पावेतो ८०/-
क वर्ग व्यापारी रु. २५000 पावेतो ५०/-
वेअर हाऊसमन बाजार क्षेत्रात कोठेही ८०/-
१० तोलणार बाजार क्षेत्रात कोठेही २०/-
११ मदतनीस बाजार क्षेत्रात कोठेही १०/-
१२ हमाल बाजार क्षेत्रात कोठेही 06/-