१) मार्केट यार्ड मध्ये शेतीमाल विक्रीसाठी सेलहॉल, अंतर्गत पक्के रस्ते, लाईट, पाणी, बॅंकींग सुविधा, अनुज्ञप्तीधारक व्यापा-यांसाठी पक्के गाळे, व्यापारी संकुल, व त्यामध्ये शेती उपयुक्त औषधे, अवजारे, खते, बियाणे, इले. साहीत्य, ईरीगेशन मटेरीयल विक्री व्यवस्था, सुलभ शौचालय, शेतकरी हमाल मापारी विश्रांती गृह, विद्युत जनरेटर, ३० मे. टन क्षमतेचा भुईकाटा, इ. सोई उपलब्ध करुन दिलेल्या आहे.
२) मार्केट यार्ड मधील अंतर्गत रस्त्याचे कॉक्रीटीकरण, शेतमालाचे बाजारभाव प्रसिद्धीसाठी इले. डिस्प्ले बोर्ड, ६० इंची टी.व्ही., पोलिस चौकी, भरारी पथकासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था, तक्रार निवारण केंद्र.
३) बाजार समितीने पेठरोड मार्केट्मध्ये अद्यावत मार्केटची उभारणी केली असुन या ठीकाणी अन्नधान्यासाठी 160 गाळे, फळांचे व्यवहारासाठी 78 गाळे, कांदा-बटाटा विभागासाठी 50 गाळ्यांची उभारणी केली असुन व्यापा-यांना पक्क्या स्वरुपचे गाळे, सेलहॉल, ट्रिमिक्स रस्ते, स्ट्रीट लाईट, बॅंकींग व्यवस्था, इ. सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.
४) बाजार आवारात शेतकरी, व्यापारी, यांना खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी संरक्षण व सुरक्षीततेसाठी पोलिस चौकी व गस्तीपथकाची नेमणुक केली असुन बाजार आवारातील चो-या, दहशत या सारख्या घटनांवर नियंत्रण केले जाते तसेच सुरक्षा रक्षक नेमुन बाजार घटकांच्या संर्स्क्षणासाठी नियंत्रण ठेवले जाते.
५) बाजार आवारात सीसीटीव्ही यंत्रणा व कॅमेरे बसविणेत आले असुन बाजार आवारात येणा-या बाजार घटकांवर नजर ठेवणेत येत असुन सुरक्षिततेसाठी उपाय योजना केलेली आहे.
६) बाजार समितीने 60 इंची प्रोजेक्षण टी.व्ही ची उभारणी केली असुन बाजार भावाची माहीती शेतक-यांना माहीतीकामी प्रसिध्द केली जाते.